शिवडी-न्हावाशेवा ट्रान्सहार्बर लिंक सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवडी-न्हावा शेवादरम्यान होत असलेल्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पाचे 76 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिली आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचेही एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीने मुंबई ट्रान्सहार्बर लिंक प्रकल्पासाठी निधी दिला आहे. 21.8 किलोमीटर लांबीचा हा ट्रान्सहार्बर मार्ग सहापदरी आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तो देशातील समुद्रावरील सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. रोज सुमारे सत्तर हजार वाहनांची त्यावरून वर्दळ होईल असे एमएमआरडीएने सांगितले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच या प्रकल्पाच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला होता. तीन टप्प्यांमध्ये या प्रकल्पाचे काम केले जात आहे.