Water And Electricity Supply वीज आणि पाण्याची मागणी वाढली, धरणातील पाणीसाठा 58 टक्क्यांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील उष्णतेच्या लाटेमुळे सध्या विजेची आणि पाण्याची मागणी वाढली आहे. कोळशाचा साठा दिवसेंदिवस कमी होत आहे आणि दुसरीकडे राज्यातल्या धरणातील पाणीसाठाही कमी होण्याची चिन्हे आहेत. सध्याच्या घडीला राज्यातल्या धरणामधील पाणीसाठा 58 टक्क्यांवर आला आहे. राज्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखल्या जाणाऱया कोयना धरणातील पाणीसाठा 40 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे वीजनिर्मितीवरही परिणाम होण्याची भीती आहे.

देशात यंदा नैऋत्य मोसमी वाऱयांसोबत येणारा मान्सून सरासरी एवढा म्हणजे 99 टक्के येणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवली आहे. ही चांगली बातमी आहे, पण यंदाची उष्णतेची लाट लक्षात घेता राज्यात पाण्याची मागणी वाढणार आहे. एप्रिल महिन्यात राज्यातल्या धरणातील पाणीसाठा पन्नास टक्क्यांवर आला आहे, पण एप्रिलचे पंधरा दिवस आणि संपूर्ण मे महिना आणि जूनमध्ये पावसाचे प्रत्यक्षात आगमन होईपर्यंत जलसाठा आणखीन खालावण्याची भीती राज्याच्या जलसंपदा विभागातील अधिकाऱयांनी व्यक्त केली आहे.

सध्या 43 टँकरने पुरवठा

राज्यात पाण्याची मागणी वाढली असली तरी सुदैवाने टँकरची मागणी अद्याप तरी वाढलेली नाही. सध्याच्या घडीला राज्यात फक्त 43 टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 79 टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. रायगड, रत्नागिरीत टँकरची गरज भासत असली तरी सिंधुदुर्ग जिह्यात सुदैवाने एकही टँकरची गरज भासलेली नाही ही विशेष बाब आहे असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.

सध्याची टँकरची संख्या

रायगड 12, रत्नागिरी 3, पालघर 19,
नाशिक 2, अमरावती 4
z राज्यातील धरणातील पाणीसाठा
58.66 टक्के
z कोकणातल्या धरणातील उपयुक्त पाणीसाठा 3 हजार दशलक्ष घनमीटर

राज्यातील काही प्रमुख धरणांतील पाणीसाठा

कोयना 40.78 टक्के
नाशिक गंगापूर 52.71 टक्के
पानशेत 98.88 टक्के
मुळशी टाटा 64.98 टक्के
भंडारदरा 58.61 टक्के
तिलारी, सिंधुदुर्ग 68.50 टक्के
धामणी (पालघर) 50.63 टक्के
बारवी (ठाणे जिल्हा) 73.53 टक्के

कोयना वीजनिर्मितीवर परिणाम
कोयना धरणातील पाणीसाठा खालावत चालल्याने वीजनिर्मितीवर परिमाण होण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्यातील विजेची मागणी सध्याच्या घडीला 28 हजार 700 मेगावॅटवर गेली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया धरणांतील साठा
n भातसा 51.17 टक्के
n मध्य वैतरणा 55.06 टक्के
n तानसा 56.11टक्के
n वैतरणा 68.63 टक्के
n मोडकसागर 56.51 टक्के