
>> ऋता कळमणकर
‘दुर्मिळ आणि संकटग्रस्त’ या मालिकेतील पहिला संकटग्रस्त प्राणी आहे Polar Bear पोलर बेअर. ध्रुवीय अस्वल.
वैश्विक तापमानवाढ (Global Warming) ही संपूर्ण जगाला भेडसावणारी समस्या मानवाच्या अमानवी भुकेमुळे निर्माण झाली आहे. आर्क्टिकच्या वातावरणात जो फरक पडतो तो जगभरच्या फरकापेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे आर्क्टिकचे अतिशय अनोखे आणि दुर्मिळ प्राणी जीवन धोक्यात आहे.
आर्क्टिकच्या संघर्षमय वातावरणात राहणारा आणि येथील अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थानावर असणारा पोलर बेअर अर्थात ध्रुवीय अस्वल. पोलार बेअर नर हा 700 किलो वजनाचा तर मादी 450 किलोंची असू शकते. बर्फाच्या गुहेमध्ये पिलांना जन्म देणारा हा प्राणी अतिशय आक्रमक व धोकादायक असतो हा अतिशय तत्परतेने कुठल्याही वार्ंनगशिवाय हल्ला करतो. भक्ष्याच्या शोधात तासन्तास न दमता बर्फाच्या पाण्यात पोहत राहतो. त्याला त्याच्या भक्ष्याचा वास फार लांबून, साधारण 1 किलोमीटर अंतरावरूनही येतो. पांढरा रंग असून डोळे मात्र काळे मोठमोठे बटन जडावल्याप्रमाणे सुंदर असतात. सील, छोटे वालरस, पक्ष्यांची अंडी तसेच मोठे मासे हे याचे खाणे आहे. याची शुभ्र आणि सुंदर फर ही पोकळ आणि तेलकट असते. त्यामुळे पोहून झाल्यावर अंग झटकले की हा कोरडा होतो. याच्या पांढऱया केसांमागची कातडी मात्र काळी असते, जी सूर्याची उष्णता शोषून घेण्यासाठी मदत करते.
‘दुर्मिळ आणि संकटग्रस्त’ या मालिकेतील पुढील प्राणी आहे Critically Endangered Species. घडियाल याला Fish eating Crocodile असेही म्हणतात. 182 individual शिल्लक आहेत अशी नोंद आहे. हा दुर्मिळ सरपटणारा प्राणी अधिवास नष्ट झाल्यामुळे, प्रचंड मासेमारी झाल्यामुळे, अन्नाच्या कमतरतेमुळे तसेच शिकारीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
घडियाल हा प्राणी काळाच्या ओघात लुप्त होत आहे. सर्व प्रकारच्या मगरीच्या शरीराची रचना पाण्यातील जीवन जगण्यासाठी अतिशय अनुकूल असते. नाकपुडय़ा वरच्या बाजूला असतात. त्यामुळे पाण्यात असतानादेखील श्वास व्यवस्थित घेऊ शकतात. कानाला, नाकाला झडप असल्यामुळे अवयवांचे रक्षण होते. यांच्या डोळ्यांवर असणाऱया पातळ आच्छादनामुळे त्यांना पाण्याच्या खाली थोडं फार दिसतं. या गणातील प्राण्याचे नाक, कान व डोळे अतिशय तीक्ष्ण असतात. अंडय़ाचे रक्षण माद्या करतात. पिलांना अंडी फोडून बाहेर येण्यास मदत करतात व पिलांना तोंडात धरून पाण्यात नेतात. घडियाल मांसाहारी आहे. मत्साहारी म्हणता येईल. तोंडाची रचना वेगळी दिसते. मासे पकडण्यासाठी तिच्या तोंडाची खास रचना असते. चंबळ नदीच्या काठावर काढलेले फोटो सोबत देत आहे.
‘दुर्मिळ आणि संकटग्रस्त’ या मालिकेतील पुढील प्राणी आहे दुर्मिळ एकशिंगी गेंडा One horn Rhino. औद्योगिकीकरणाची सुरुवात झाली आणि हा प्राणी नाहीसा होण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला. प्रचंड जंगलतोड हे प्राणी जीवनावरील मोठे संकटच आहे. प्राण्यांची कातडी, दात, शिंगे यासाठी मानवाने अतिशय क्रूरपणे प्राणी जीवन संपवत आणले. आपली अतिरेकी भूक विनाशक आहे. गेंडय़ाच्या शिंगात लैंगिक उत्तेजना देणारे औषधी गुण आहेत. या अत्यंत चुकीच्या समजुतीमुळे पूर्वी सिंधूपासून ब्रह्मदेशपर्यंत सर्वत्र दिसणारा एकशिंगी गेंडा आता फक्त आसामपुरता मर्यादित आहे. गेंडय़ाची शिंगे केरोटीन या फायब्रोस प्रोटीनने बनलेली असतात जे नखांमध्ये व केसांमध्ये आढळते. यांची शिंगे औषधी असल्याच्या गैरसमजुतीमुळे यांची खूप प्रमाणात हत्या झाली. अजूनही होतेच आहे.अतिशय जाड चिलखतासारखी कातडी असणारे एकशिंगी गेंडे एकटे राहणे पसंत करतात.





























































