
लग्न करण्यासाठी तरुणीकडे लावलेल्या तगाद्याला कंटाळून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना नगर शहरातील चितळे रोड येथे ही घटना घडली. या संदर्भात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंद्रजित राजू माणकेश्वर (वय 19, रा. श्री गणेशकॉलनी, आलमगीर) असे आरोपीचे नाव आहे. मयत तरुणी अकरावीत शिक्षण घेत होती. तसेच, पार्ट टाईम एका एजन्सीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होती. शुक्रवारी दुपारी सिद्धीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शवविच्छेदनासाठी शव सिव्हील हॉस्पिटल या ठिकाणी नेले असता, तेथे आरोपी इंद्रजित माणकेश्वर हा मृतदेहाजवळ जाऊन बोलत असल्याचे मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी पाहिले.
त्यानंतर आरोपीचा मोबाईल तपासला असता, त्यामध्ये तिला बायको म्हणून मेसेज केल्याचे आढळले. लग्नासाठी आरोपी इंद्रजित माणकेश्वर याने तगादा लावल्याने सिद्धीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे तपास करत आहेत.



























































