
शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मोठी घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे बाजारात सोमवारी मोठी घसरण झाली आहे. जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे अनेक गुतंवणूकदारांनी विक्रीवर जोर दिल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 2.01 टक्क्यांनी म्हणजेच 1,172.19 अंकांनी घसरून 57,166.74 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीचा निर्देशांक 1.73 टक्क्यांनी म्हणजे 302 अंकांनी घसरून 17,173.65 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारात सर्वात जास्त घसरण इन्फोसिसच्या शेअरमध्ये झाली. कंपनीच्या तिमाही अहवालामुळे या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. तसेच एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा यांच्या शेअरमध्येही चार टक्क्यांनी घसरण झाली आहे.
विप्रो, टीसीएस, एचसीएल टेक, एशियम पेंट्स, कोटक महिंद्रा बँक, एसबीआय, भारती एअरटेल,अट्राटेक सिमेंट,सार्सन अँड ट्रुब्रो, बजाज फिनडर्व, बजाज फायनान्स, सन फार्मा. इंडसइंड बँक, डॉक्टर रेड्डीज, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या शेअरमध्येही घसरण झाली आहे.
एनटीपीसी, टाटा स्टील,मारुती, टायटन, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा, पॉवरग्रिड, नेस्ले इंडिया, अॅक्सिस बँक आणि आयटीसी हे शेअर थोड्याशा तेजीत बंद झाले. अनेक कंपन्यांचे तिमाही अहवाल अपेक्षेप्रमाणे आलेले नाहीत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक संकेतामुळे बाजारात विक्री वाढली. त्यामुळे बाजारात घसरण झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.




























































