कायरॉन पोलार्डमधील क्रिकेट अजून संपलेले नाही, लंगोटी यारच्या निवृत्तीने सुनील नरीन व्यथित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेस्ट इंडीजचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू कायरॉन पोलार्डने बुधवारी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मात्र पोलार्डने घेतलेल्या या अचानक निवृत्तीमुळे त्याचा लंगोटी यार सुनील नरीन कमालीचा व्यथित झाला. ‘पोलार्डमधील क्रिकेट अजून संपलेले नाही. विंडीज क्रिकेटला देण्यासाठी त्याच्याकडे अजून खूप काही शिल्लक आहे,’ अशी प्रतिक्रिया कोलकाता नाइट रायडर्सचा फिरकीपटू सुनील नरीनने दिली.

नरीन म्हणाला, ‘पोलार्डचा हा निवृत्तीचा निर्णय दुःखदायक आहे. कारण त्याच्यातील क्रिकेट अजून संपलेले नाही असे माझे ठाम मत आहे. मात्र पोलार्डच्या निर्णयाचा मी नक्कीच आदर करतो. त्याच्या दृष्टीने हीच निवृत्तीची योग्य वेळ असू शकते. पोलार्डला भावी वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. यानंतर तो ज्या स्पर्धेत खेळेल त्या स्पर्धेमध्ये त्याला भरघोस यश मिळेल.

‘वयाच्या दहाव्या वर्षापासून वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न बघितले होते. मागील 15 वर्षांपासून मी एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व करतोय. मात्र आता पूर्ण विचाराअंती मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’ – कायरॉन पोलार्ड