
पुणे शहरातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला करून फरार झालेल्या दोघांना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने अटक केली. आरोपींना स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अजय सुभाष गायकवाड (वय 24 रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) आणि अनिल परशुराम विसरे (वय 26, इंदीरानगर, गुलटेकडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
त्यावेळी स्वारगेटमध्ये एकावर हल्ला करून फरारी झालेले कात्रज डेपोजवळ येणार असल्याची माहिती सुमीत ताकपेरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, श्रीकांत दगडे, नीलेश शिवतरे, सुमीत ताकपेरे, धनंजय ताजणे यांनी केली.



























































