सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सासरच्या छळाला कंटाळून महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 19 एप्रिलला मांजरी बुद्रूकमधील विजय सैनिक कॉलनीत घडली.

आरती विश्वजीत भोसले (वय 27) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विश्वजीत भोसले याच्यासह इतरांविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैजनाथ वाडीकर (वय 52 रा. लातूर) यांनी फिर्याद दिली आहे.

आरती आणि विश्वजीत यांचे डिसेंबर 2018 मध्ये लग्न झाले. त्यानंतर किरकोळ कारणांवरून वाद घालत विश्वजीत आरतीला शिवीगाळ आणि मारहाण करीत होता. त्याशिवाय कुटुंबातील इतर लोकही तिला छळ करीत होती. छळास कंटाळून आरतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक एस. टी. माने तपास करीत आहेत.