एसी लोकल आणि फर्स्ट क्लासचे दर घटले, 5 मेपासून दर कपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ac-local-train

मुंबईकरांना वाढत्या महागाईच्या वणव्यात थंडावा देणारी बातमी आहे. एसी लोकलच्या आणि साध्या लोकलच्या फर्स्ट क्लासच्या तिकीट दरात 5 मेपासून कपात करण्यात आली आहे. एसी लोकलच्या तिकीट दरात जवळपास निम्म्याने कपात झाली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यासंदर्भात शुक्रवारी दुपारी सुतोवाच केल्यानंतर रात्री उशिरा रेल्वे बोर्डाने पत्रक काढून शिक्कामोर्तब केले.

पहिल्या पाच किलोमीटर अंतरासाठी एसी लोकलचे एकेरी प्रवासाचे तिकीट 65 रुपयांवरून आता 29 रुपये होणार आहे.
फर्स्ट क्लासचे एकेरी प्रवासाचे तिकीट 23 रुपये असणार आहे.