
नागपूर पोलीस भवनाच्या उद्घाटन सोहळय़ासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक विषयांवर फटकेबाजी करताना पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची चांगलीच शाळा घेतली. अजित पवार म्हणाले की, मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून गृहमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नसला पाहिजे. पोलिसांना पूर्णपणे योग्य पद्धतीने तपास करण्याची मुभा असली पाहिजे. नाहीतर तो माझा आहे, जरा दुर्लक्ष कर, आता तो सापडला आहे, तर त्याचं कामच करू नको हे असलं काही होता कामा नये. लक्षात ठेवा, शेवटी आपण सर्व बारा कोटी जनतेला जबाबदार असल्याचे ते म्हणाले.
अजित पवार यांनी महासंचालक रजनीश सेठ यांना सुनावले
नागपूर पोलीस भवोनाच्या उद्घाटन सोहळय़ासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक विषयांवर फटकेबाजी करताना पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची चांगलीच शाळा घेतली. अजित पवार म्हणाले की, मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून गृहमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नसला पाहिजे. पोलिसांना पूर्णपणे योग्य पद्धतीने तपास करण्याची मुभा असली पाहिजे. नाहीतर तो माझा आहे, जरा दुर्लक्ष कर, आता तो सापडला आहे, तर त्याचं कामच करू नको हे असलं काही होता कामा नये. लक्षात ठेवा, शेवटी आपण सर्व बारा कोटी जनतेला जबाबदार असल्याचे ते म्हणाले.





























































