सौर ऊर्जेवर धावणारी सायकल, ओडिशातील इलेक्ट्रिशियन तरुणाचा भन्नाट प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवसेंदिवस वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी आर्थिक झळ बसत आहे. वाढत्या इंधनवाढीच्या दरावर अनेकजण भन्नाट प्रयोग करत आहेत. ओडिशा राज्यातील केद्रापारा जिह्यामधील एका 28 वर्षीय इलेक्ट्रिशियनने सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक सायकल तयार केली आहे. सौम्य रंजन पलाई असे इलेक्ट्रिशियनचे नाव आहे. या सायकलवरून ताशी 25 किलोमीटर वेगाने प्रवास करता येतो. या सायकलची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

सौम्य पलाई भुवनेश्वरपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या रजनिका ब्लॉकमधील पेगारपाडा येथील रहिवासी आहे. त्याने सौर ऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक सायकल तयार केली. सायकलवर सौर पॅनेल आणि सायकल चालवता येणारे इंजिन बसवले आहे. तीन महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर त्याची ही स्वप्नवत सायकल तयार झाली. 23 एप्रिल रोजी सौम्यने सायकलवरून घरापासून बालासोरपर्यंतचा 110 किलोमीटरचा प्रवास केला.

n सायकलच्या छतावर सोलर पॅनेल आहे आणि त्याचा वापर बॅटरी चार्ज करण्यासाठी केला जातो. सायकल पूर्ण चार्ज होण्यासाठी पाच ते सहा तास सूर्यप्रकाशात ठेवावी लागते. त्यानंतर ती 150 किलोमीटर धावू शकते. सूर्यप्रकाश नसतानाही ती इलेक्ट्रिक सॉकेटद्वारे चार्ज करता येते. जर बॅटरीचे चार्ंजग उतरले तर पॅडलचा वापर करून आपल्याला इच्छितस्थळी पोहोचता येते, अशी माहिती सौम्य पलाई याने दिली.