ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली आहे. दक्षिण मुंबईतील एका रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. मागील चार दिवसांपासून ते उपचार घेत असून प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रविवारी सकाळी त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर आणण्यात आले. पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जाणार आहे.

धर्मेंद्र यांचा पुत्र अभिनेता सनी देओल याने रविवारी रुग्णालयात जाऊन धर्मेंद्र यांची भेट घेतली. धर्मेंद्र रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी सोशल मीडियात पसरली. त्यानंतर देशभरातील असंख्य चाहत्यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. 86 वर्षीय धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे. मात्र ते काही दिवस रुग्णालयातच देखरेखीखाली असतील. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.