
हिंदुस्थानी वंशाचे नंद मूलचंदानी यांची अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर यंत्रणेतील प्रमुख पदावर नियुक्ती झाली आहे. सीआयएचे पहिले मुख्य तांत्रिक अधिकारी म्हणून मूलचंदानी यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मूलचंदानी हे मूळचे दिल्लीतील असून येथील ब्लूबेल्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्यांनी आठ वर्षे शिक्षण घेतले होते.
सीआयएचे संचालक विलियम जे बर्न्स यांनी रविवारी मूलचंदानी यांच्या नियुक्तीची घोषणा केली. मूलचंदानी यांना सिलिकॉन व्हॅलीबरोबरच संरक्षण विभागात काम करण्याचा जवळपास 25 हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. मूलचंदानी यांच्या नियुक्तीवर बर्न्स यांनी समाधान व्यक्त केले. आम्हाला अत्यंत खुशी झाली आहे की देशाच्या गुप्तचर क्षेत्रात मूलचंदानी हे आमच्या टिमचे भाग बनले आहेत. मूलचंदानी यांना संरक्षण विभागातील कामाचा प्रचंड अनुभव आहे. या अनुभवाचा सीआयएला खूप फायदा होईल, असा विश्वास बर्न्स यांनी व्यक्त केला.


























































