
कोकणात जुलै नंतर नद्यांना पुर येण्याचे प्रकार नवीन नाहीत मात्र आज भर मे महिन्यात तालुक्यातील उमरे नदिला अचानक पुर आल्याने ग्रामस्थांमध्य़े भितीचे वातावरण पसरले आहे.
या पुराच्या कारणाचा शोध घेतला असता उमरे पाझर तलावाचे दरवाजे कामासाठी उघडल्याने हा प्रकार घडला. मात्र याची कोणतीही पूर्वसूचना ग्रामस्थांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आजच्या प्रकारात सुदैवाने जीवितहानी टळली आहे. या घटनेबाबत आमदार शेखर निकम यांना कळविण्यात आले असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.






























































