काय बोलू! राहुल गांधींच्या सभेपूर्वीच्या व्हिडीओवरून भाजपचा ट्रोलिंगचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने ट्रोलिंगचा प्रयत्न केला आहे. एका व्हिडीओवरून ही टीका करण्यात येत आहे. हा व्हिडीओ तेलंगणा येथील असल्याची माहिती मिळत आहे.

भाजप नेता अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राहुल गांधी हे काही काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांसोबत दिसत आहेत. ते या व्हिडीओमध्ये, काय बोलू? मला काय सांगायचं आहे? असं विचारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ तेलंगणातील शेतकऱ्यांच्या एका कार्यक्रमापूर्वीचा असल्याचं बोललं जात आहे.

17 सेकंदाच्या या व्हिडीओत राहुल गांधी म्हणतात की, आजचा मुख्य विषय काय आहे? काय नेमकं बोलायचं आहे? असं गांधी म्हणताना दिसतात. त्यावर टीका करताना मालवीय म्हणाले की, शुक्रवारी तेलंगणा येथे राहुल गांधी यांची रॅली होती. तेव्हा ते विचारताहेत की थीम काय आहे, काय बोलायचं आहे. हे तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही परदेशवारी आणि नाइट क्लबिंग करताना अध्येमध्ये राजकारण करता, असं मालवीय म्हणाले आहेत.