ओसाड जमिनीवर फुलवली देवराई, नाशिकचे इंजिनीअर शेखर गायकवाड यांची किमया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंगर, नाशिक. या ओसाड जमिनीत एका निसर्गवेडय़ा माणसाने ‘समृद्ध देवराई’चे स्वप्न रुजवले. सोबतीला हजारो नाशिककर आले अन् लोकचळवळीतून त्याच दिवशी 11 हजार रोपांची लागवड झाली. तेव्हापासून न चुकता आठवडय़ातून दोन दिवस या माणसाने झाडांची जिवापाड काळजी घेतली. आता बरोबर 7 वर्षांनी 23 हजार देशी झाडे, दुर्मिळ वेली आणि झुडूपांनी तेथे देवराई आकाराला आलीय. या देवराईसह म्हसरूळजवळील वनराई, अनोखी कमळबाग नाशिकचे वैभव ठरले आहे. ही किमया घडवली आहे शेखर गायकवाड यांनी.

मेपॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर फॅब्रिकेशन व्यवसायात गुंतलेल्या शेखर गायकवाड यांनी निसर्गप्रेम टिकवून ठेवले. वर्कशॉपच्या रस्त्यावरील झाडांना जगविण्यासाठी ते धडपडू लागले. ही सुरुवातच आजच्या लोकचळवळीचा पाया रचणारी होती. प्रथम गांधीनगर फुलसुंदर इस्टेट भागात त्यांनी दीडशे प्रकारच्या वृक्षांचे परिचय पेंद्र साकारले. झटपट वाढणाऱया विदेशी झाडांचा अट्टहास सोडा, केवळ प्रदेशनिष्ठ झाडेच लावा, असे कळकळीचे आवाहन ते करतात. कधीकाळी जंगल असलेल्या फाशीच्या डोंगराला पुन्हा हिरवेगार करण्याची इच्छा त्यांनी वनविभागाकडे बोलून दाखवली आणि
5 जून 2015 पासून हा प्रवास सुरू झाला.

– प्रज्ञा सदावर्ते

प्राणी-पक्ष्यांना हक्काचा निवारा

‘कुठलीही संस्था सोबतीला नसताना माझ्या आवाहनानंतर नाशिककर मदतीला धावून आले, हा विश्वासच प्रेरणादायी होता. त्यामुळेच न थकता स्वखर्चातून तर कधी लोकसहभागातून काम सुरू आहे. या प्रयत्नांमुळेच आधी 38 एकरात सुरू केलेले काम आता 55 एकरांपर्यंत पोहोचले आहे. कृष्णवड, काटेचुंबळ, पायर, पिवळा करमळ अशी 220हून अधिक प्रजातीची 23 हजार झाडे, 48 प्रकारच्या जंगली वेली, 45 प्रकारची झुडपे, 27 प्रकारची पंदमुळे देवराईत रुजलीयत. या प्रदेशनिष्ठ झाडांमुळेच पुन्हा एकदा प्राणी, पक्ष्यांना हक्काचा अधिवास मिळाला आहे’,असे गायकवाड सांगतात.

2016 पासून म्हसरूळजवळ वनविभागाच्या 35 एकर जागेत वनराई प्रकल्प गायकवाड यांनी हाती घेतला, तोही आता बहरलाय. तेथेच जलवनस्पतींचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पहिलीवहिली कमळबाग फुलवली. येथे दीडशे प्रजातींची कमळ फुले मन मोहून टाकणारी आहेत. आता ते 26 प्रकारच्या बांबू लागवडीत व्यस्त आहेत.