शिवशाही बसची पाच वाहनांना धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टोल देण्यासाठी उभ्या असणाऱ्या वाहनांना ब्रेक निकामी झालेल्या शिवशाही बसने पाठीमागून धडक दिल्याची घटना किणी टोलनाक्यावर गुरुवारी दुपारी घडली आहे. यात चार-ते पाच वाहनांचे नुकसान झाले असून, दोनजण जखमी झाले आहेत.

पुण्याहून कोल्हापूरकडे प्रवाशांना घेऊन निघालेल्या शिवशाही बस किणी टोलनाक्यावर आली असता, तिचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे टोल देण्यासाठी उभ्या असलेल्या कारला बसने धडक दिली. यानंतर ही कार आणखी दोन ते तीन वाहनांना धडकली. यात गाडय़ांचे नुकसान झाले असून, दोघे जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची नावे समजू शकली नाहीत.