मुंबईच्या विकासासाठी एकच नियोजन प्राधिकरण, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मुंबईच्या विकासासाठी महापौरांच्या नेतृत्वाखालील एकच नियोजन प्राधिकरण स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असून ते वर्षभरात अस्तित्वात येईल.’ अशी घोषणा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केली. पर्यावरण आणि हवामानावर आधारित ‘क्लायमेट क्रायसीस 2.0’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे त्या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. ‘मुंबईच्या विकासासाठी 16 विविध यंत्रणा कार्यरत आहेत. त्या 42 प्रकारची कामे हाताळतात. मुंबईसारख्या शहराला एकाच स्वतंत्र नियोजन प्राधिकरणाची गरज आहे. त्यामुळे प्रकल्पांना विलंब होणार नाही आणि दूरगामी विकास साधता येईल.’ असे आदित्य ठाकरे म्हणाले. हवामान बदलामुळे निर्माण होणाऱया समस्या दूर करण्यासाठी ‘नॅशनल काwन्सिल ऑफ क्लायमेट अॅक्शन’ची निर्मिती करण्याची गरज आहे, असे मतही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

n मुंबईसाठी सीईओ नेमण्याऐवजी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापौरांना जास्त अधिकार देण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे.