
धूम स्टाईलने मोटारसायकल चालवून पादचाऱ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ओशिवरा पोलिसांनी अटक केली. शहजाद खान आणि तारिक खान ऊर्फ कालू अशी त्या दोघांची नावे आहेत. ते दोघे सराईत चोर असून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.
तक्रारदार हे जोगेश्वरी येथे राहत असून गेल्या महिन्यात ते जोगेश्वरीच्या बेहरामबाग येथून जात होते. तेव्हा मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी तक्रारदार यांचा मोबाईल चोरून पळ काढला. मोबाईल चोरी झाल्यानंतर तक्रारदार यानी ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. ओशिवरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक मनोहर धनवडे यांच्या पथकातील उपनिरीक्षक तुषार सावंत, माने, मुजावर, बारसिंग, सोयके, चोपडे, सकपाळ, गीते यांच्या पथकाने तपास केला.


























































