
इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱयांनी 7 मे रोजी रांची विमानतळावर दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखले होते. या घटनेची गंभीर दखल आता नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) घेतली असून इंडिगो एअरलाईन्सला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. डीजीसीएच्या एका पथकाने या प्रकरणाची सखोल चौकशी केली आहे. इंडिगो एअरलाईन्सने नियमांचे पालन केले नाही तसेच प्रवाशांना अयोग्यरितीने हाताळल्याचे कमिटीने आपल्या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी इंडिगो एअरलाईन्सला कारणे दाखवा नोटीस बजावत दहा दिवसात आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.



























































