एमयूटीपीसाठी राज्य सरकारने दीडशे कोटी दिले, प्रकल्पांना गती मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
railway-tracks-mumbai-local

मुंबई रेल्वे विकास महामंडळाला आता आणखी दीडशे कोटी रुपयांचा निधी मंगळवारी एमएमआरडीएच्यावतीने राज्य सरकारने दिला आहे. याआधीही दीडशे कोटींचा फंड ट्रान्सफर करण्यात आला होता. एकूण 300 कोटी रूपये आतापर्यंत मिळाले असल्याने मुंबईच्या  पायाभूत प्रकल्पांना चालना मिळणार आहे.

मुंबई रेल्वे विकास महामंडळ हे राज्य आणि केंद्र सरकारच्या सम-समान निधीतून मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात रेल्वेच्या पायाभूत प्रकल्पांसाठी काम करीत असते. रेल्वेच्या अर्थसंकल्पात यंदा एमयूटीपी – 3 च्या प्रकल्पांसाठी 750 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. परंतु राज्य सरकारचा वाटा न आल्याने रेल्वेनेही आपला निधी थांबविला होता. राज्य सरकारकडून गेल्याच पंधरवड्यात 150 कोटीचा निधी एमएमआरडीएच्यावतीने देण्यात आला होता. आता आणखी 150 कोटीचा निधी मिळाल्याने टेंडर काढण्याची कामे सुरू होतील.

कुर्ला ते सीएसएमटी पाचवी व सहावी मार्गिका, 47 एसी लोकल, कळवा ते ऐरोली एलिवेटेड लिंक, पनवेल ते वसई नवा रेल्वे मार्ग, विरार ते डहाणू चौपदरीकरण अशा प्रकल्पांना चालना मिळणार असल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे प्रवक्ते सुनील उदासी यांनी सांगितले.