हेलिकॉप्टरमधून डागले जहाजविरोधी क्षेपणास्त्र, बालासोरमध्ये यशस्वी चाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संरक्षण विभागाच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि हिंदुस्थानी नौदलाने एकात्मिक चाचणी श्रेणीतून नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून प्रक्षेपित केलेल्या स्वदेशी-विकसित नौदल जहाजविरोधी क्षेपणास्त्र्ााची पहिली उड्डाण चाचणी ओडिशाच्या किनाऱयाजवळ चांदीपूर येथे यशस्वीरीत्या आज पार पडली. डीआरडीओच्या सूत्रांनी येथे ही माहिती दिली.

या क्षेपणास्त्र्ा चाचणी मोहिमेने आपली सर्व उद्दिष्टे पूर्ण केली. हिंदुस्थानी नौदलासाठी विकसित केलेली ही पहिली स्वदेशी हवाई प्रक्षेपित जहाजविरोध क्षेपणास्त्र्ा प्रणाली आहे, असे सूत्रांनी सागितले.

या क्षेपणास्त्र्ााने नियोजित सागरी प्रक्षेपणाचे अचूक अनुसरण पेले. क्षेपणास्त्र्ााने नियंत्रण, मार्गदर्शन आणि मोहिमेचे प्रमाणीकरण करून उच्च पातळीच्या अचूकतेसह नियुक्त लक्ष्य गाठले.

या क्षेपणास्त्र्ााच्या सर्व उप-प्रणालींनी समाधानकारक कामगिरी केली. या चाचणीत टार्गेट पॉइंट जवळ तैनात सेन्सर्सनी क्षेपणास्त्र्ााच्या प्रक्षेपणाचा मागोवा घेतला. या क्षेपणास्त्र्ाात हेलिकॉप्टरसाठी स्वदेशी विकसित लाँचरसह नवीन तंत्रज्ञान वापरले आहे. या क्षेपणास्त्र्ा मार्गदर्शन प्रणालीमध्ये अत्याधुनिक नेव्हिगेशन सिस्टिम आणि एकात्मिक एव्हीओनिक्सचा समावेश आहे. ही उड्डाण चाचणी डीआरडीओ आणि हिंदुस्थानी नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी पाहिली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी क्षेपणास्त्र्ााच्या पहिल्या विकासात्मक उड्डाण चाचणीसाठी डीआरडीओ, हिंदुस्थानी नौदल आणि संबंधित संघांचे अभिनंदन केले. जहाजविरोधी क्षेपणास्त्र्ा प्रणालीत स्वदेशी रचना वापरून तिच्या विकासामध्ये देशाने उच्च पातळी गाठली आहे, असे सिंह यांनी सांगितले. ही प्रणाली नौदलाची आक्रमक क्षमता मजबूत करेल.