
दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी बारामुल्ला येथील एका वाइन शॉपवर हॅण्डग्रेनेडच्या सहाय्याने हल्ला केला होता. याप्रकरणी चार दहशतवादी आणि लष्कराच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कश्मीरच्या पोलीस महानिरीक्षक यांनी दिली. दहशतवाद्यांकडून पाच पिस्तुले, 23 ग्रेनेड आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. 17 मे रोजी बुरखा घातलेल्या दहशतवाद्यांनी नव्याने उघडण्यात आलेल्या दारूच्या दुकानावर ग्रेनेडद्वारे हल्ला केला होता. यात दुकानात काम करणारे चार कर्मचारी गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यातील एका कर्मचाऱयाचा मृत्यू झाला आहे.


























































