
निठारी हत्याकांड प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने मुख्य आरोपी सुरेंद्र कोली याला फाशीची तर सहआरोपी मोनिंदर पंढेर याला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय न्यायालयाने कोली याला 40 हजार रुपयांचा तर मोनिंदरला चार हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सीबीआय कोर्टाचा हा निर्णय निठारी प्रकरणाशी संबंधित 14 व्या प्रकरणात आला आहे. सुरेंद्र कोलीला आतापर्यंत 13 गुह्यांमध्ये फाशीची शिक्षा झाली असून तीन प्रकरणांत पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.



























































