भाजप आमदार राम सातपुते यांच्या गाडीला अपघात, गाडीचे तीन टायर फुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपचे आमदार राम सातपुते यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात सातपुते यांना कोणतीही इजा झाली नाही. सातपुते यांनी स्वत: सोशल मीडियावरून एक व्हिडीओ शेअऱ करत या अपघाताची माहिती दिली.

राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे आमदार आहेत. मतदारसंघात कामानिमित्त फिरत असताना त्यांच्या गाडीचे तीन टायर फुटले. ”मी सुखरूप आहे… आज मतदार संघातील प्रवासादरम्यान माझा अपघात झाला यामध्ये गाडीचे तीन टायर फुटले परंतु जनताजनार्दनाच्या आशीर्वादाने व पांडुरंगाच्या कृपेने मला व माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची इजा अथवा काहीही दुर्घटना घडलेली नाही”, अशा पोस्ट सोबत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.