सचिन वाझेला दिलासा नाही, जामीन फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनसुख हिरेन हत्या प्रकरण तसेच खंडणीप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेला दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिला. न्या. राहुल रोकडे यांनी सचिन वाझेचा जामीन अर्ज आज फेटाळून लावला.

या प्रकरणाचा ईडीकडून तपास पूर्ण झाला असून आरोपपत्रही दाखल झाले आहे. त्यामुळे आपल्याला जामीन देण्यात यावा, अशी मागणी वाझेने केली होती. सुनावणीवेळी ईडीच्या वतीने वाझेच्या अर्जाला तीव्र विरोध केला. वाझे कटाचा सूत्रधार असून जामीन मिळाल्यास तो फरार होण्याची शक्यता आहे. जामीन दिल्यास तो साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो, असा दावा ईडीच्या वतीने ऍड. सुनील गोन्साल्विस यांनी केला. न्यायालयाने ईडीची बाजू ग्राह्य धरत वाझेचा जामीन अर्ज फेटाळून लावला.