
ब्लू स्टार लिमिटेडने नावीन्यपूर्ण डीप फ्रीझर्सची श्रेणी बाजारात आणली आहे. तसेच वाडा येथे कंपनीने नवीन जागतिक दर्जाच्या उत्पादन सुविधेच्या माध्यमातून आपल्या उत्पादनाचा विस्तारसुद्धा वाढवला आहे. डीप फ्रीझर्सच्या नवीन श्रेणीत साठवणुकीसाठी अधिक जागा आणि कुलिंगची सुविधा प्रदान करते. नवीन स्वदेशी डिझाइनवर आधारित आणि उत्पादित केलेली डीप फ्रीझरची श्रेणी +2DeesC ते -24DeesC दरम्यान तापमान नियंत्रण राखते. हार्ड टॉप आणि ग्लास टॉप अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असलेले हे मनमोहक डीप फ्रीझर्स 300 ते 650 लिटर साठवणूक क्षमतेच्या माध्यमातून अधिकाधिक जागा देतात.



























































