
दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक पह्रममध्ये महाराष्ट्राने सक्षमपणे आपले स्थान अधोरेखित केले आहे. महाराष्ट्राला जगात सर्वत्र व्यासपीठ उपलब्ध झालेच पाहिजे यासाठी हा प्रयत्न आहे. सक्षम हिंदुस्थानसाठी सक्षम महाराष्ट्राची तितकीच आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पर्यावरण व पर्यटनमंत्री अदित्य ठाकरे यांनी आज केले.
महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीला चालना मिळावी, राज्यात उद्योग वाढावेत यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच ऊर्जामंत्री नितीन राऊत हे स्वित्झर्लंड येथील दावोस दौऱयावर आहेत. येथील आंतरराष्ट्रीय इकॉनॉमिक पह्रममध्ये महाराष्ट्र दालन उघडण्यात आले असून त्याचे उद्घाटन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. विविध देशांतील गुतवणूकदारांसाठी हे दालन पर्वणी ठरणार आहे. या दौऱयाची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे दिली. जागतिक स्तरावरील उद्योजकांना सोबत घेऊन महाराष्ट्राची वाटचाल ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
शिष्टमंडळाने आज इंडिया पॅव्हेलियनला भेट दिली. राज्य पॅव्हेलियनमध्ये भेट घेतलेल्या प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये पॅकेजिंगमध्ये अग्रेसर असलेली जपानची पर्यावरण स्नेही सनटोरी या पंपनीशी चर्चा झाली तर रसायन क्षेत्रातील बहुराष्ट्रीय यू पी एल या पंपनीने रायगड जिह्यात 250 एकर भूखंडावर 5000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी यूएईच्या पर्यावरणमंत्री मारिया अल मेहरी यांच्याशी द्विपक्षीय पर्यावरणीय सहयोग वाढविण्याबाबत चर्चा केली तसेच बेल्जियम येथील भंगारावर पुनर्प्रक्रिया करणाऱया बहुराष्ट्रीय पंपनीचे अध्यक्ष सुरेन्द्र पटवारी यांच्यासह चर्चा केली.
जागतिक आर्थिक परिषदेचे आयोजन 22 ते 26 मे 2022 या कालावधीत दावोस, स्वित्झर्लंड येथे करण्यात आले आहे. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी.मलिकनेर, महाव्यवस्थापक (पणन व जनसंपर्क) अभिजित घोरपडे हे उपस्थित होते.
‘ग्लोबल प्लॅस्टिक अॅक्शन पार्टनरशिप’ करार
महाराष्ट्र दालनात पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि वर्ल्ड इकॉनॉमिक पह्रम यांच्यात ‘ग्लोबल प्लॅस्टिक अॅक्शन पार्टनरशिप’ संदर्भात करार झाला. GPAPचे सदस्य असणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य सरकार झाले आहे. पर्यावरणाच्या दिशेने हे कृती करण्याचे दशक आहे. या कराराच्या माध्यमातून 400हून अधिक सदस्य संस्था एकत्र आल्या असून जगातील प्लॅस्टिक प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.



























































