
सहकारी संस्थांचे लेखा परिक्षण करण्यासाठी संबंधित उमेदवाराने किमान डिप्लोमा इन को-ऑपरेशन ऍण्ड अकाऊंटन्सी (जीडीसी) हा अभ्यासक्रम पूर्ण करणे अवश्यक आहे, तर हाऊसिंग सोसायटय़ांचे काम पाहणाऱयाने को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मॅनेजमेंट (सीएचएम)हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे गरजेचे आहे. त्यासाठी सहकार विभागाकडून 27 ते 29 मे या कालावधीत जीडीसी ऍण्ड ए आणि सीएचएम परीक्षा घेण्यात येणार आहेत. सदरच्या परीक्षा राज्यभरातील विविध केंद्रांवर होणार आहेत. परीक्षेला अर्ज केलेल्या उमेदवारांचे हॉल तिकीट उपलब्ध करून दिले असून त्यांना ते युझर आयडी आणि पासवर्डचा वापर करून डाऊनलोड करता येणार असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.




























































