
धारावी एलबीएस रोड टाटा पॉवर हाऊसजवळ मोबाईल टॉवरचे काम करीत असताना तीन कामगारांना इलेक्ट्रिक शॉक लागून ते जखमी झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एकाची प्रकृती गंभीर असून दोन जणांना उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
प्रेमनगर येथील एअरटेल टॉवर दुरुस्तीच्या वेळी तीन कामगारांना दुपारी 3.30 च्या सुमारास शॉक लागल्याची घटना घडली. जखमींपैकी एकजण 90 टक्के भाजल्याने त्याची प्रकृती गंभीर असून शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित दोनजण किरकोळ जखमी झाल्याने उपचारानंतर दोघांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील अधिकाऱयाने दिली.

























































