यूपीआय ऍपद्वारेही एटीएममधून काढा पैसे 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आता बँकांच्या एटीएम मशीनमधून यूपीआयद्वारे पैसे काढता येणार आहेत. त्यासाठी बँकांच्या एटीएम मशीनमध्ये ही सुविधा सुरू करण्यासाठी यूपीआयचा पर्याय अपडेट केला जात आहे. त्यामुळे यापुढे गुगल पे, पेटीएम, फोन पे तसेच यूपीआयशी जोडलेल्या कोणत्याही ऍपद्वारे पैसे काढता येणार आहेत. एटीएम डेबिट कार्ड विसरलेल्यांना धावपळ न करता एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.