
बिहरच्या बेतिया येथील नरकटियागंजच्या भाजप आमदार रश्मी वर्मा यांचा नातेवाईकांसोबत धक्काबुक्की व हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आमदार रश्मी वर्मा या आपल्या नातेवाईकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करत असल्याचे दिसत आहेत. ही घटना एक आठवड्यापूर्वी घडली आहे.
आमदार रश्मी वर्मा यांच्या म्हणण्यानुसार मागील 40 वर्षांपासून त्यांच्या संपत्तीवर नातेवाईकांनी अनधिकृत कब्जा केला आहे. यासंदर्भात नातेवाइकांवर कोर्टात केसही देखील सुरू आहे. त्यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला आहे की या बागेतून त्यांना एक आंबा देखील तोडून दिला जात नाही.
गेल्या आठवड्यात आमदार वर्मा या स्वतः या आंब्याच्या बागेत गेल्या होत्या. यावेळी बागेतील आंबा तोडत असताना तिथे नातेवाईक त्यांच्या मुलीसह दाखल झाले. यावेळची आमदार व त्यांच्या नातेवाईकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला.

























































