
शहरातील विविध भागांतून दुचाकीसह मोबाइल चोरी करणाऱ्या सराईत अल्पवयीनाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने ताब्यात घेतले. त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन दुचाकी, टॅब असा 2 लाख 55 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
चरण सुरेश सोनावणे (20 रा.वडगांवशेरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपी सागर प्लाझा परिसरात येणार असल्याची माहिती युनिट एकला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी यांच्या पथकाने सापळा रचून अल्पवयीनाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार चरण सोनावणे याच्या मदतीने दुचाकी चोरीसह मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. ही कामगिरी अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदिप भोसले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, अशोक माने, दत्ता सोनावणे, राहुल मखरे, शशिकांत दरेकर, अनिकेत बाबर, महेश बामगुडे, तुषार माळवदकर यांनी केली.





























































