
काही दिवसांपूर्वी सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याने आपल्या वाढदिवसाची जंगी पार्टी ठेवली होती. पण, याच पार्टीनंतर अनेक सेलिब्रिटी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने पार्टी सुपर स्प्रेडर ठरल्याची शंका व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी करणने आपल्या 50व्या वाढदिवसाची एक मोठी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण, या पार्टीनंतर तिला हजर असलेल्यांपैकी 50 ते 55 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
करणच्या पार्टीत 50 ते 55 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त बॉलिवूड हंगामाने दिलं आहे. अनेक कलाकारांनी अद्याप कोरोनाची लागण झाल्याचं जाहीर केलं नसल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे.
अद्याप कतरिना कैफ आणि अक्षय कुमार हे दोघेही कोरोना संक्रमित आढळले आहेत. त्यांच्या खेरीज आदित्य रॉय कपूर आणि कार्तिक आर्यन हे दोघेही गृहविलगीकरणात आहेत. ही यादी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


























































