
उत्तराखंडमधील प्रसिद्ध चारधाम यात्रेला निघालेल्या भाविकांच्या बसला रविवारी यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. बस दामटाजवळ येताच खोल दरीत कोसळली. या अपघातात 26 भाविकांचा मृत्यू झाला, तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले. हे सर्व प्रवासी मध्य प्रदेशमधील रहिवासी आहेत. खोल दरी आणि अंधाराच्या अडचणींमुळे मृतदेह दरीतून रस्त्यावर आणण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मृतांची ओळख पटलेली नाही. अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची भरपाई जाहीर केली.




























































