धक्कादायक! टीम इंडियाच्या माजी खेळाडूच्या वडिलांना अटक, काय आहे प्रकरण?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा माजी खेळाडू नमन ओझा (Naman Ojha) याच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. मध्य प्रदेशमधील मुलताई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 2013 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राच्या (Bank of Maharashtra) जौलखेडा शाखेमध्ये बनवाट खाते उघडून किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 1.25 कोटींची फुसवणूक केल्या आरोप त्यांच्यावर आहे.

मुलताई पोलीस ठाण्याचे प्रभारपी सुनील लता यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यापासून व्ही.के. ओझा फरार होते. आता त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कलम 409, 420, 468, 471, 120 बी, 34 आणि आयटी कायद्याच्या कलम 65 आणि 66 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर सर्व आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.

‘जनसत्ता’ने दिलेल्या वृत्तानुसार, 2013 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेमध्ये शाखा प्रमुख अभिषेक रत्नम यांनी फसवणुकीची योजना आखली होती. मात्र, त्याची बदली झाल्यानंतर ओझा आणि इतरांनी मिळून जून 2013 मध्ये जवळपास 34 बनावट खाते उघडून यावर किसान क्रेडिट कार्डचे कर्ज हस्तांतरित करत 1.25 कोटींचा घोटाळा केला होता.

हेराफेरी झाली तेव्हा नमन ओझाचे वडील व्ही.के. ओझा हे शाखा प्रमुख होते. यानंतर जवळपास एक वर्षानंतर तत्कालीन शाखा प्रमुख रितेश चतुर्वेदी यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. बनावट नावे आणि फोटोंच्या आधारावर शेतकरी क्रेडिट कार्ड बनवून बँकेतून पैशांचा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता.

दरम्यान, नमन ओझा हा टीम इंडियाचा माजी खेळाडू आहेत. त्याने एक सोटी, एक वन डे आणि दोन टी-20 सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच आयपीएलमध्येही तो 113 लढती खेळल्या आहेत. प्रथम श्रेणीच्या 146 लढतीही त्याने खेळल्या असून त्याने 22 शतक आणि 55 अर्धशतकांच्या मदतीने 9753 धावा केल्या आहेत. तसेच यष्टीमागे त्याने 471 बळीही घेतले आहेत.