
आरक्षणाच्या मागणीसाठी राजस्थानमध्ये पुन्हा तीव्र आंदोलन सुरू झाले आहे. माळी, कुशवाह शाक्य आणि मौर्य समाजाने स्वतंत्रपणे 12 टक्के आरक्षणाची मागणी केली आहे. या समाजांतील शेकडो लोकांनी सोमवारी हातात लाठया घेऊन भरतपूरमधील आग्रा-जयपूर हा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. हे आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने भरतपूर व आसपासच्या चार शहरांतील इंटरनेट 24 तास बंद ठेवले आहे.
























































