बीपीसीएल पुणे येथे रक्तदान मोहीम 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) पुणे कार्यालयात नुकतेच रक्तदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहयोगाने बीपीसीएलने हा उपक्रम राबवला. बीपीसीएलचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, डीलर्स, वितरक आणि चॅनेल पार्टनर्स यामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी झाले. यावेळी एकूण 52 युनिटस् रक्त जमा झाले. उपक्रमाबाबत प्रतिक्रिया नोंदवताना बीपीसीएलचे कर्मचारी, महाराष्ट्र आणि पुणे – स्टेट हेड (आय अँड सी) तन्मय जैसवाल म्हणाले, ‘बीपीसीएलच्या सिद्धांतांचे पालन करत मी गेली 30 वर्षे सातत्याने रक्तदान करत आहे.