
आंतरबँक परकीय चलन बाजारात हिंदुस्थानी रुपयाची विक्रमी घसरगुंडी सुरूच राहिली आहे. बुधवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 18 पैशांनी घसरला. त्यामुळे रुपयाच्या मूल्याने प्रतिडॉलर 78.22 रुपयांची आतापर्यंतची नीचांकी पातळी गाठली. मागील काही दिवस रुपयाची सातत्याने घसरण सुरू आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची चिंता वाढली आहे.
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांमध्ये मोठी वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली गेल्यानंतर डॉलर मजबूत होऊन रुपया आणखी कमजोर झाला

























































