
सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयामध्ये एका ज्येष्ठ महिलेच्या कण्यावर दुर्मिळ ट्रान्सकॅथेटर ट्रायकसपिड वाल्व्ह रिप्लेसमेंट (टीटीव्हीआर) प्रत्यारोपण करण्यात आले. देशातील ही अशाप्रकारची पहिली शस्त्रक्रिया ठरली आहे.
मुंबईतील प्रफुल्ला शाह (63) या महिलेवर ट्रायकसपिड व्हॉल्व्ह अरुंद करण्यासाठी 2005 मध्ये प्रथम ओपन हार्ट सर्जरी केली होती. शस्त्रक्रियेच्या 15 वर्षानंतर, रुग्णाला वारंवार श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. गेल्या 6 महिन्यांत रुग्णाची प्रकृती एवढी खालावली की, तिला काही पावलांपेक्षा जास्त चालता येत नव्हते. जुना सर्जिकल व्हॉल्व्ह खराब झाल्यामुळे रुग्णाला काही पावलांमध्येसुद्धा श्वास घेता येत नव्हते.
टीटीव्हीआर प्रक्रिया रुग्णासाठी जीव वाचवणारी होती कारण दुसऱया ओपन-हार्ट प्रक्रियेमुळे गुंतागुंत होऊ शकली असती आणि ती प्राणघातकदेखील होती. या शस्त्रक्रियेसाठी फक्त दीड तास लागला, रुग्णाला काहीच टाके पडले नाहीत. देशातील पहिला स्पायनर-3 ट्रायकस्पिड व्हॉल्व्ह शस्त्र्ाक्रियेशिवाय प्रत्यारोपित करून 48 तासांच्या आत घरी सोडण्यात आले. ही टीटीव्हीआर शस्त्र्ाक्रिया स्ट्रक्चरल हार्ट प्रोग्राम प्रमुख डॉ. मौलिक पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या टीमने केले. शस्त्रक्रिया करणाऱया टीममध्ये डॉ. भारत दळवी, डॉ. मनोज मश्रू, डॉ. रोहित बुनागे, डॉ. निरंजन आणि डॉ. दर्शना राठोड आणि टीमचा समावेश होता.























































