किशोर वागळे कृतज्ञता सोहळा 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वरळी- कोळीवाडय़ात गेली 36 वर्षे ज्ञानसागर क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या तीन पिढय़ा घडविणारे किशोर वागळे यांचा त्यांच्या निवृत्तीनिमित्त ज्ञानसागरच्या माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. रविवार, 19 जून रोजी सायंकाळी 6 वाजता वरळी-कोळीवाडय़ात हा सोहळा होणार आहे. युनेस्कोचा सात कोटींचा ‘आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू प्रवीण आमरे आणि महाराष्ट्राचे पहिले ‘भारत श्री’ विजू पेणकर या सोहळय़ास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळय़ात माजी विद्यार्थ्यांनी भेट दिलेल्या पुस्तकातून किशोर वागळे यांची 3पुस्तक तुला करण्यात येणार आहे.