
>>महेश कोळी
मोबाईलवर विना-इंटरनेट व्हिडीओ पाहायला मिळण्याचा दिवस दूर नाही. दूरसंचार विभागाने यूजर्सच्या मोबाईलमध्ये थेट ब्रॉडकास्ट सुविधा उपलब्ध करणाऱया स्पेक्ट्रम बँडच्या शक्यता पडताळण्यासाठी एक समिती नेमली आहे. या विभागाच्या सचिवांचे म्हणणे असे आहे की, 526-582 मेगाहर्टझ् मोबाईल आणि ब्रॉडकास्ट दोन्ही सेवांसाठी काम करू शकतो. याच बँडचा अभ्यास ही समिती करणार आहे.
काही दिवसांनंतर तुम्ही तुमच्या मोबाईलवर इंटरनेटशिवाय व्हिडीओ, क्रिकेट, चित्रपट आणि अन्य मल्टीमीडिया पंटेन्ट थेट पाहू शकणार आहात. डायरेक्ट टू मोबाईल म्हणजेच डीटूएम ब्रॉडकास्टिंग तंत्रज्ञानामुळे हे सर्व शक्य होणार आहे. डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अर्थात डॉट आणि प्रसारभारती हा देशातील पहिला पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टर या तंत्रज्ञानावर काम करीत आहे. डीओटीने गेल्याच वर्षी आयआयटी कानपूरसोबत या तंत्रज्ञानाच्या चाचणीसाठी भागीदारी केली होती. डीओटीने त्यासाठी एका समितीची नियुक्ती केली आहे. परंतु हे डीटूएम तंत्रज्ञान नेमके काय आहे? बिना इंटरनेट थेट मोबाईलवर अखेर कसे होणार प्रक्षेपण? हे तंत्रज्ञान कसे संपूर्ण जग बदलून टाकणार आहे? याची माहिती घेणे निश्चितच रंजक ठरेल.
डायरेक्ट टू मोबाईल ब्रॉडकास्ट म्हणजे डीटूएमचा अर्थ आहे व्हिडीओ आणि अन्य मल्टीमीडिया पंटेन्ट थेट आपल्या मोबाईलवर ब्रॉडकास्ट किंवा प्रसारित करणे. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास इंटरनेट, केबल किंवा डीटीएच आदी माध्यमांचा आधार न घेता आपल्या मोबाईलमध्ये बातम्या, क्रिकेट आदींचे व्हिडीओ प्रसारित करण्याची सुविधा मिळेल. त्याचबरोबर इंटरनेटशिवाय आपल्याला पह्नवर हॉटस्टार, सोनी लाइव्ह, झी फाइव्ह, अमेझॉन प्राइम आणि नेटफ्लिक्ससारखे ओटीटी प्लॅटफॉर्म दिसू शकतील. पह्नमध्ये असलेला रिसीव्हर रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये बदल करतो आणि त्यामुळे आपण ‘एफएम’चे कार्यक्रम ऐकू शकतो. लोक एकाच मोबाईलवर अनेक फ्रिक्वेन्सीची रेडिओ एफएम स्टेशन ऐकू शकतात. त्याचप्रमाणे ‘डीटूएम’च्या माध्यमातून मल्टीमीडिया पंटेन्ट पह्नमध्ये थेट ब्रॉडकास्ट करण्यात येईल.
वास्तविक हे तंत्रज्ञान म्हणजे ब्रॉडबँड आणि ब्रॉडकास्ट यांच्या मिश्रणातून तयार होईल. या तंत्रज्ञानामुळे मोबाईल पह्नवर बातम्या, क्रिकेट, ओटीटी पंटेन्ट पाहता येईल. यातील महत्त्वाचा भाग असा की, पह्नमध्ये प्रसारित होणारे व्हिडीओ बफरिंगशिवाय प्रसारित होतील आणि त्यांचा दर्जा चांगला असेल. कारण यात कोणताही इंटरनेट डेटा वापरला गेला नसेल. या तंत्रज्ञानाचा सर्वांत मोठा फायदा असा असेल की, नागरिकांशी संबंधित कोणतीही माहिती थेट त्यांच्या मोबाईलपर्यंत पोहोचविता येईल. त्यामुळे फेक न्यूज रोखण्यास, इमर्जन्सी अलर्ट जारी करण्यास आणि आपत्ती व्यवस्थापनास मदत मिळेल. कोणत्याही प्रकारचा मोबाईल डेटा खर्च न करता वापरकर्ते व्हिडीओ ऑन डिमांड (व्हीओडी) किंवा ओटीटी पंटेन्ट थेट आपल्या मोबाईलवर मिळवू शकतील. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ही सुविधा वापरकर्त्यांना अत्यंत कमी दरात उपलब्ध होईल.
ग्रामीण भागात जेथे इंटरनेटच्या सुविधा अद्याप नाहीत किंवा अत्यल्प आहेत, तेथील लोकही या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असा व्हिडीओ पंटेन्ट बघू शकतील, जो आता फक्त शहरातील लोकच पाहू शकतात. याचा सर्वांत मोठा फायदा टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स म्हणजे दूरसंचार सेवाप्रदात्या पंपन्यांना होईल. या पंपन्या व्हिडीओ ट्रफिक आपल्या मोबाईल नेटवर्कमधून ब्रॉडकास्ट नेटवर्कवर ऑफलोड करू शकतील. किमती मोबाईल स्पेक्ट्रमची बचत करणे यामुळे पंपन्यांना शक्य होईल. मोबाईल स्पेक्ट्रमच्या वापरात यामुळे सुधारणा होतील आणि बँडविड्थवरील दबाव कमी होईल. त्यामुळे कॉल ड्रॉपसारख्या समस्या उद्भवणार नाहीत आणि डेटा स्पीड वाढविण्यास मदत होईल. माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा यांच्या म्हणण्यानुसार, डीटूएममुळे ब्रॉडकास्टर्सना फायदा होईल, कारण त्यांना नवीन प्रेक्षकवर्ग मिळेल. ब्रॉडकास्टिंगच्या ग्राहकांची संख्या सध्या आपल्या देशात केवळ 20 ते 21 कोटी घरांपर्यंतच मर्यादित आहे, कारण एवढय़ाच घरांमध्ये टेलिव्हिजन आहे. डीटूएम तंत्रज्ञान आल्यानंतर ब्रॉडकास्टर्सच्या ग्राहकांची संख्या अनेक पटींनी वाढेल. काही वर्षांतच ती 100 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, कारण 2026 मध्ये मोबाईल यूजर्सची संख्याच हिंदुस्थानात तेवढी असणार आहे.
सध्या या बँडचा वापर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देशभरात टेलिव्हिजन ट्रान्समीटर्ससाठी केला जातो. डीटूएम तंत्रज्ञान ब्रॉडबँड आणि ब्रॉडकास्टच्या कन्व्हर्जनमधून म्हणजेच मिलाफातून तयार होईल. डायरेक्ट टू मोबाईल आणि फाइव्ह-जी ब्रॉडबँड यांच्या मिलाफातून हिंदुस्थानात ब्रॉडबँड आणि स्पेक्ट्रमच्या वापरात सुधारणा होईल. डीटूएम तंत्रज्ञान आल्यानंतर ब्रॉडकास्टिंगच्या पारंपरिक प्लॅटफॉर्म्सवर म्हणजेच केबल आणि डीटीएच क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. कारण डीटूएममध्ये कोणत्याही इंटरमीडिएटरी म्हणजेच अन्य कोणत्याही माध्यमाविना थेट घरांमध्ये प्रक्षेपण होईल. हे तंत्रज्ञान सध्या खूपच बाल्यावस्थेत आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार डीटूएम तंत्रज्ञान मोठय़ा स्तरावर लाँच करण्यासाठी सर्वांत मोठे आव्हान मोबाईल ऑपरेटर्ससह अन्य संबंधितांना एकत्र आणणे ही असणार आहे.
(लेखक संगणक अभियंता आहेत)





























































