दहावीत कमी गुण मिळाल्याने शिक्षकाच्या मुलाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने शिक्षकाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हा विद्यार्थी जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील असून, शिक्षणासाठी तो कर्जत येथे राहत होता.

मयूर महादेव हजारे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. महादेव हजारे हे जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील रहिवासी असून, ते कर्जत तालुक्यात शिक्षक म्हणून नोकरीला आहेत. त्यांचा मुलगा मयूर (अथर्व) हजारे हा कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता. शुक्रवारी दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला. यात मयूर यास 60 टक्के गुण मिळाले. यामुळे त्यास नैराश्य आले व घरात कोणी नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.