Photo – मुंबईची मुलगी भोजपुरी सिनेमा गाजवतेय, कोण आहे ती ‘लेडी सिंघम’?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोजपुरी चित्रपटांमध्ये राणी चटर्जी (Rani Chatterjee) हिची गणती यशस्वी अभिनेत्रींमध्ये होते. तिला भोजपुरी सिनेमाची ‘लेडी सिंघम’ असेही बोलले जाते.

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्रीचा संबंध यूपी-बिहार नाही तर पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राशीही आहे.

राणी चटर्जी हिचा जन्म 3 नोव्हेंबर 1989 ला महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहरामध्ये झाला. मुंबईतच तिने प्राथमिक शिक्षणही घेतले.

राणी चटर्जी हिचे खरे नाव शबिही शेख असून मुंबई विद्यापीठातून तिने पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

कलेच्या जीवनामध्ये पाऊल ठेवल्यानंतर 2003 मध्ये भोजपुरी फॅमिली ‘ड्राम ससुरा बडा पैसावाला’मध्ये ती प्रथम झळकली. यात भोजपुरी स्टार मनोज तिवारीचीही प्रमुख भूमिका होती.

एका चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान तिला राणी हे नाव मिळाले. चित्रपट दिग्दर्शक अजय सिन्हा यांनी तिला हे नाव दिले. आतापर्यंत तिने 350हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

2013 मध्ये राणीला ‘नागिन’ चित्रपटासाठी सर्वोत्तम भोजपुरी अभिनेत्रीचा, तर 2017 मध्ये तिला दादा साहेब फाळके पाऊंडेशनद्वारे सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.