अनिल परब यांची सलग तिसऱ्या दिवशी ‘ईडी’ चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्याचे परिवहनमंत्री ऍड. अनिल परब यांची मनी लॉण्डरिंगप्रकरणी आज सलग तिसऱया दिवशी चौकशी केली.

अनिल परब आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास बॅलार्ड इस्टेट येथील ‘ईडी’च्या कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले. सागरकिनारा नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करून दापोली येथील साई रिसॉर्टचे बांधकाम झाले आणि त्या बांधकामात आर्थिक गैरव्यवहार झाला असा आरोप आहे. याच प्रकरणात परब यांची चौकशी सुरू आहे. मंगळवारी दहा तास तर बुधवारी सहा तास परब यांची ‘ईडी’च्या अधिकाऱयांनी चौकशी केली होती