
चेहरा सुंदर दिसण्यासाठी दातांचे महत्त्वही अनन्यसाधारण आहे. याकरिता दातांची नियमित काळजी घेणे, त्यांना कीड लागू नये म्हणून दिवसातून दोन वेळा ब्रश करणे आवश्यक आहे. दातांना लागलेल्या किडीमुळे पायरियासारखे आजारही होऊ शकतात. हे टाळण्यासाठी हल्ली बरेच जण इलेक्ट्रिक टूथब्रशचा वापर करत असल्याचे आढळून आले आहे.
दात स्वच्छ राहावेत आणि त्यांचे आरोग्य टिकून राहावे याकरिता इलेक्ट्रिक ‘Y-ब्रश’ तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. यामध्ये NylonMed V2 टूथब्रशदेखील मिळतो. वयवर्षे 4 ते 12 वर्षापर्यंत लहान मुलांसाठीही हे ब्रश तयार करण्यात आले आहेत. लहान मुलांचे तोंड छोटे असल्यामुळे त्यांच्याकरिता याकरिता S या आकाराचा टूथब्रश मिळतो. 12 पेक्षा जास्त वयाकरिता M साईझचा टूथब्रश मिळतो.
या ब्रशसोबत इंटीग्रेटेड बॅटरी आणि हा ब्रश चार्ज करण्यासाठी 1 यूएसबी केबलही मिळते. हे ब्रश 10 सेकंद तोंडात ठेवल्यास दात स्वच्छ होण्याचा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये सॉफ्, नॉर्मल आणि इटेंस या सॉनिक व्हायब्रेशन मोडसही देण्यात आले आहेत. याकरिता या ब्रशला 35 हजार नायलॉन ब्रिसल्स आहेत.





























































