
लष्करातील एका जवानाने झोपेत असलेल्या आपल्या दोन सहकाऱयांवर अंदाधुंद गोळ्या झाडल्या. त्यात दोन्ही जवानांचा मृत्यू झाला. गौरी शंकर हट्टी आणि तेलांगी सुर्याकांत शेशीराव अशी मृत जवानांची नावे असून शेशीराव हा महाराष्ट्राच्या लातूर जिह्यातील बडेगाव येथील रहिवासी आहे.
पंजाबच्या पठाणकोट जिह्यातील मिरथल येथील 15 गार्ड बटालियनमध्ये जवानांमधील अंतर्गत वादातून रविवारी रात्री उशिरा ही गोळीबाराची घटना घडली. लोकेश कुमार ध्रुव असे गोळीबार करणाऱया जवानाचे नाव असून सुरक्षा दलांनी रात्रभर परिसरात सर्च ऑपरेशन सुरू ठेवत ध्रुव याला अटक केली.



























































