
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस आणि बल्लारशाह दरम्यान साप्ताहिक 8 विशेष गाड्या चालवणार आहे.
01127 अतिजलद विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. 5.7.2022 ते 26.7.2022 (4 सेवा) पर्यंत दर मंगळवारी 21.45 वाजता सुटेल आणि बल्लारशाह येथे दुसऱ्या दिवशी 12.10 वाजता पोहोचेल.
01128 अतिजलद विशेष दि. 6.7.2022 ते 27.7.2022 (4 सेवा) पर्यंत दर बुधवारी बल्लारशाह येथून 13.40 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 05.30 वाजता पोहोचेल.
एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, 8 शयनयान, दोन लगेज व गार्डच्या ब्रेक व्हॅनसह 5 सामान्य द्वितीय श्रेणीच्या बोगी असणार आहेत.
या ट्रेनसाठी ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, वरोरा, चंद्रपूर येथे थांबे देण्यात आले आहेत.
आरक्षण सुरू!
विशेष ट्रेन क्र. 01127 साठी विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर आधीच सुरु झाले आहे.

























































