
त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणासह शाहीस्नानाच्या तारखा पुरोहित संघाने अखिल भारतीय षङ्दर्शन आखाडा परिषदेकडे सुपूर्द केल्या आहेत. त्यानुसार पहिले शाहीस्नान 2 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे.
अखिल भारतीय षङ्दर्शन आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष जयंत शिखरे, प्रवक्ते राजेश दीक्षित आदींनी तारखा सादर केल्या. यावेळी सागरानंद सरस्वती, शिवगिरीजी महाराज, विष्णुगिरी महाराज, निळकंठगिरी महाराज, इच्छागिरी महाराज यांच्यासह साधू, महंत उपस्थित होते. आखाडा परिषदेच्या संयुक्त बैठकीत तिथींची निश्चिती करून त्या जाहीर केल्या जातील.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण अश्विन वद्य षष्ठाr, 31 ऑक्टोबर 2026 रोजी होईल. प्रथम शाहीस्नान- आषाढ कृष्ण अमावस्या, 2 ऑगस्ट 2027; दुसरे शाहीस्नान- श्रावण वद्य अमावस्या, 31 ऑगस्ट 2027; तिसरे शाहीस्नान- भाद्रपद शुद्ध द्वादशी, 12 सप्टेंबर 2027 ; तर ध्वजावतरण- श्रावण शुद्ध तृतीया, 24 जुलै 2028 रोजी होईल.


























































