
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील मंदिरातील पिंडीवर बर्फ साठल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याची सत्यता तपासण्यासाठी देवस्थान ट्रस्टने सीसीटीव्ही फूटेजच्या तपासणीचे आदेश दिले आहेत.
त्र्यंबकेश्वर येथील आद्य ज्योतिर्लिंग मंदिरातील पिंडीवर काल गुरुवारी पहाटे बर्फाचा थर जमा झाल्याचा दावा पुजाऱयांनी केला. हा व्हिडीओ कालपासून प्रचंड व्हायरल झाला आहे. याआधी पिंडीतून बुडबुडे येण्याची घटना घडली होती. बर्फाचा थर मात्र कधीही जमा झालेला नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. हे तापमान बदलामुळे घडले की चमत्कार, या चर्चांना उधाण आले आहे.
आज पहाटे मात्र असा कोणताच बर्फाचा थर दिसला नाही, असे पुजाऱयांनी सांगितले. त्यामुळे त्या व्हिडीओची सत्यता तपासली जाणार आहे. सीसीटीव्ही फूटेजची यासाठी मदत घेतली जाणार आहे.
























































